ही काळाची गरज - आ. प्रशांत ठाकूर
पनवेल वैभव / दि.२३ (संजय कदम):  नवीन पनवेल पूर्व सेक्टर ६ मधील जी सी  अस्पिरा २०६ सोसायटीचा संकुलात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच सोसायटी कार्यालय व वाचनालय यांचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर याचा हस्ते करण्यात आले, 
           यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन  करतेवेळी २६ जानेवारी  व १५ ऑगस्ट  प्रमाणे शिवजयंती ही प्रत्येक सोसायटीत उत्साहात साजरी झाली पाहिजे असे असे प्रतिपादन केले तसेच वाचन संस्कृतीचे जतन करण्यासाठी वाचनालय फार महत्त्वाची आहेत व सोसायटीच्या आवारात वाचनालय सुरू केल्याबद्दल सोसायटीच्या समितीचे विशेष  कौतुक व अभिनंदन केले. यावेळी स्वरगंध कलावृंद यांनी पोवाडे व भक्तिगीतांचा कार्यक्रम सदर केला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर प्रेरणादायी अस व्याख्यान व्याख्याते राजेंद्र घाडगे, सातारा, यांनी सादर दिले.  सोसायटीतील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमात महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता. सर्व पुरुष व महिला पारंपारिक वेशात सहभागी झाले होते. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉ.कविता चौतमोल, अस्पिरा सोसायटीचे अध्यक्ष बळीराम साबळे, सचिव विशाल टोपकर, कोषाध्यक्ष  डी.के. सिंग आणि सांस्कृतिक समितीचे संयोजक प्रशांत खांदवे तसेच साई सितारा सहकारी  सोसायटीचे अध्यक्ष अजितकुमार कुलकर्णी, सचिव अरविंद मोरे, त्यांच्या पत्नी प्रा.डॉ.नीलिमा अरविंद मोरे यांच्यासह इतर सहकारी आदी उपस्थित होते.  याप्रसंगी अरविंद मोरे यांनी वाचनालयास शिवाजी कोण होता आणि स्वयंलिखित कुतूहलाचा करिश्मा ही पुस्तके भेट दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत खांदवे यांनी केले तर आभार सुरेश खरात यांनी मानले.
फोटो: आमदार प्रशांत ठाकूर