पनवेल परिसरातील दुचाकीच्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक ठार एक जखमी ..
 वेगवेगळ्या अपघातात एक ठार एक जखमी ..


पनवेल दि. १५ ( वार्ताहर )  : पनवेल परिसरात झालेल्या दोन  वेगवेगळ्या अपघातात एक ठार एक जखमी झाल्याची घटना घडली आहे . 
                    पनवेल जवळील गव्हाण फाटा ब्रिजच्या कच्या रस्त्यावर दुचाकीस्वार शिवम सिन्हा ( २७ ) हा दुचाकीसह खाली  पडल्याने झालेल्या अपघातात तो स्वतः गंभीररित्या जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाला आहे . तर दुसऱ्या अपघातात ऋतिक घरत (रा. धाकटी जुई ) हा इलेक्ट्रिक बाइक (एमएच ४६ सीएन ८२११) घेऊन एएससी कॉलेज गोरील सेवा रस्त्यावर जेएनपीटीकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून जात होता. कार  वरील चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. वाहन डावीकडे घेतल्याने दुचाकीने कारला धडक दिली. यात दुचाकी चालक जखमी झाला. यात दुचाकीचे नुकसान झाले आहे . या दोन्ही अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments