शिवसेने तर्फे शिवाजीनगर वसाहतीतील नागरिकांना मतदान ओळखपत्रे काढून वाटप..
नागरिकांना मतदान ओळखपत्रे काढून वाटप..

पनवेल दि.०८ (वार्ताहर): पनवेल शहरातील शिवाजीनगर वसाहती मधील नागरिकांना शिवसेनेतर्फे मतदान ओळखपत्र काढून देण्यात  आले.
            शिवसेना पनवेल शहर प्रसिद्धीप्रमुख तोफिक बागवान यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने पनवेल शहरातील शिवाजीनगर वसाहती मधील नागरिकांना मतदार ओळखपत्र काढून देण्यात आले. त्याचे वाटप पनवेल शहर शाखा येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमास पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे उपशहर प्रमुख मच्छिंद्र झगडे व अर्जुन परदेशी युवा सेना विभाग प्रमुख अनिकेत जेस्वाल व शिवसैनिक उपस्थित होते.फोटो: शिवाजीनगर वसाहती मधील नागिरकांना मतदान ओळखपत्र वाटप
Comments