पनवेलमधील राईसमिलचे चित्र जहांगीर आर्ट गॅलरीत...
पनवेल दि.०५(वार्ताहर): पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पनवेलच्या वेगवगेळ्या ऐतिहासिक वस्तूंच्या छटा कागदावर जशाचा तशे उमटवणाऱ्या युवा चित्रकार केविन डायस याने काढलेली दोन चित्रांची निवड मुंबईत होणाऱ्या आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय वार्षिक कला प्रदर्शनात झाली आहे.
पनवेलमधील 120 वर्षे जुन्या युसूफ राईस मीलचे केविन डायसने गतवर्षी काढले होते. हे चित्र राष्ट्रीय वर्षी कला प्रदर्शनात झळकत आहे. मुंबई फोर्ट येथे आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या 106 व्या राष्ट्रीय वार्षिक कलाप्रदर्शन सुरू आयोजित करण्यात आले आहे. खुला आणि विद्यार्थी गटात देशभरातून विद्यार्थी चित्र पाठवत असतात. चित्रकला क्षेत्रात नामांकित समजल्या जाणाऱ्या चित्रकला प्रदर्शनात पनवेलच्या केविन डायस याचे दोन चित्रांची निवड झाली आहे. एकेकाळी भाताचे कोठार असलेल्या शहरात अनेक मिल आहेत.
फोटो: राईसमिलचे चित्र