पनवेल शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमांसंदर्भात जनजागृती अभियान...
रस्ता सुरक्षा अभियान २०२४ ...

पनवेल दि. ०२ ( वार्ताहर ) : रस्ता सुरक्षा अभियान 2024  चे अनुषंगाने पनवेल शहर वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमासंदर्भात जनजागृती अभियान पनवेलमध्ये राबवण्यात आले. 
           यामध्ये पनवेल शहर हद्दीत नवीन पनवेल सिग्नल ,ओरियन मॉल , छत्रपती शिवाजी महाराज चौक, पनवेल रेल्वे स्टेशन येथे छोटा पोलीस ,यमराज, दारू बॉटल यासारखे मॉस्केट द्वारे हेल्मेट न घालणे सिग्नल जम्प न करणे, सीट बेल्ट लावणे, मद्यपाशन करून वाहन न चालवणे इ . वाहतूक नियमाचे पालन करणेबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पाटील,पोलीस उपनिरीक्षक महाडिक , पंधरे निकम , शेरखाने व पनवेल वाहतूक शाखेचे कर्मचारी हजर होते. 


फोटो:  रस्ता सुरक्षा अभियान 2024
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image