राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पनवेल मध्ये आनंदोत्सव साजरा
पनवेल : - निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस असून पक्षाचे घडयाळ बहाल केल्याबद्दल पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महादेव पाटील यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या पक्ष व चिन्हाच्या निकालानंतर कळंबोली येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.पेढे वाटून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. मुनीर तांबोळी, डॉ श्रेयस ठाकूर,पंकज शहा, सुरेश पानमंद, शहाजी पाटील, वैजनाथ मोरे, दिलीप लंबाते व असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.