घरफोडी करणाऱ्या अल्पवयीन मुलास पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात...
अल्पवयीन मुलास पनवेल तालुका पोलिसांनी घेतले ताब्यात...


पनवेल दि २३, (वार्ताहर) :  पनवेल तालुका परिसरात दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
          तालुकयातील वावंजे गाव परिसरात असलेल्या दोन वेगवेगळ्या घरात एका अल्पवयीन मुलाने घरफोडी करून मोठ्या प्रमाणात रोख रक्कमेसह इतर ऐवज चोरून नेला होता या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संजय गळवे, पो.हवा विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे, पोशी आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदार च्या  सहाय्याने सखोल तपास करून सदर आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Comments