पनवेल वन विभागाची धडक कारवाई ; लाखो रुपयांच्या खैराच्या लाकडांसह दोघेजण ताब्यात....
    खैराच्या लाकडांसह दोघेजण ताब्यात.... 


पनवेल दि. १५ ( संजय कदम  )  : पनवेल वन विभागाने मध्यरात्रीच्या सुमारास कळंबोली परिसरात केलेल्या धडक कारवाईत लाखो रुपयाची खैराची लाकडे विना परवाना घेऊन जाणाऱ्या ट्रक ला ताब्यात घेतले असून या प्रकरणी ट्रक चालकासह त्याच्या सहकार्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  
                           पनवेल वन विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे व वनपाल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष पथकाला सदर लाखो रुपये किमतीची खैराची लाकडे घेऊन वापी बाजू कडून एक ट्रक कोकणातील सावर्डे या ठिकाणी  अवैध पद्धतीने घेऊन जातअसल्याची माहिती त्यांना मिळाली.  त्यानुसार मध्यरात्रीच्या सुमारास या पथकाने सापळा रचून संशयित ट्रकला अडवून त्याची तपासणी केली असता . त्या ट्रक मध्ये लाखो रुपये किमतीची खैराच्या झाडांची लाकडे आढळून आल्याने सदर मुद्देमाल ट्रकसह पनवेल वनविभागाने जप्त केला आहे .तसेच ट्र्क चालक अक्रम युसूफ खान शेख वय (24) राहणार सुरत आणि मन्सुरी महम्मद शहीद सलीम (27) रा. सुरत याना ताब्यात घेण्यात आले आहे . 



फोटो - वन विभागाची कारवाई
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
महिलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी ममता प्रितम म्हात्रे सक्रिय – पनवेलमध्ये कर्करोग प्रतिबंध मोहिमेला वेग...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image