संस्थने उठविला सिडको विरोधात आवाज...
पनवेल, दि.22 (वार्ताहर) ः खांदा वसाहत व आसुडगाव भागातील सोसायट्यांना करण्यात येणार्या पाणी पुरवठ्याच्या पाईपमधून पिशव्या व मासे अडकल्यामुळे पाण्याचे प्रेशर कमी होते व प्रवाह सुद्धा बंद होत होता. या संदर्भात परिवर्तन सामाजिक संस्था महाराष्ट्रचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी संबंधित सिडकोच्या अधिकार्यांची भेट घेवून या बेजबाबदारपणाबद्दल जाब विचारला आहे.
आसुडगाव येथील सोसायट्यांना गेल्या 15 ते 20 दिवसापासून पाणी पुरवठा पाईपलाईन मधून पाणी मीटरपर्यंत प्लॅस्टीक पिशवीचे तुकडे येत होते. तसेच अनेक सोसायट्यांच्या पाईपलाईनमधून मासे येत असल्याच्या तक्रारी तेथील सोसायट्यांच्या पदाधिकार्यांनी परिवर्तन संस्थेकडे केल्या होत्या. यामुळे आर्थिक भुर्दंड सोसायट्यांना बसत होता. या तक्रारींची दखल घेत परिवर्तन सामाजिक संस्था महाराष्ट्राचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी सिडको पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता यांची भेट घेवून या नागरी प्रश्नाकडे लक्ष वेधून तातडीने सुरळीत पाणी पुरवठा अशी मागणी करण्यात आली आहे.
फोटो ः महादेव वाघमारे