डॉ.मुनीर तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी निवड...
डॉ.मुनीर तांबोळी यांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी निवड...


पनवेल / प्रतिनिधी: मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, हिन्दुस्तान २४ तासचे मुख्य संपादक डॉ. मुनीर तांबोळी यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्त करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.खासदार सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अल्पसंख्यांक राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी, प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण, रोजगार व स्वयंरोजगार विभाग महाराष्ट्र राज्य प्रमुख मेघा पवार, सरचिटणीस मेहबूब सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी डॉ.श्रेयस ठाकूर, पंकज शहा, कुमार नागपाल, सूरज नागे, शमीम खान, शहनाज खान, शाहीन खान, नेहा किरनली यांच्या सह शेकडो सहकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला.डॉ. मुनीर तांबोळी यांनी सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले आहेत. रोजगार, कौशल्य विकास, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
दरम्यान अजितदादा पवार यांच्या विकासाच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन महाराष्ट्रात अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी दादांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळत असल्याने या संधीचे नक्कीच सोने करण्यात येईल अशी प्रतिक्रिया या वेळी डॉ.मुनीर तांबोळी यांनी दिली.
Comments