नमो चषक चित्रकला स्पर्धेत ७० हजार स्पर्धकांची नोंदणी ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
 आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ..

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील उद्योन्मुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नमो चषकचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नमो चषक चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे मावळ लोकसभा निडवणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 16) उद्घाटन झाले. या स्पर्धेत 70 हजार स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. 
महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमो चषक स्पर्धा घेण्यात येत असून पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये पनवेल, कामोठे, कळंबोली, खारघर मंडलात चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यानुसार या स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लीक स्कूलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. 
या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अनिवाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, गोपीनाथ भगत, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, भाऊ भगत, काकासाहेब कुत्तरवडे, नारायण पोपेटा, युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष तेजस जाधव, आदित्य भगत, वर्षा शेलार, महिला मोर्चा अध्यक्षा वनिता पाटील, सोनाली खरटमोल, दुर्गा बन्सल, सारीका पाचपुते, साधना आचार्य आदी उपस्थित होते. 
या स्पर्धेचे भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक आणि मुख्याध्यापीका स्वप्नाली म्हात्रे यांनी संयोजन केले आहे.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image