चोरीस गेलेली महागडी बुलेट मोटारसायकल पनवेल शहर पोलिसांनी आणली राजस्थानातून परत..
   शहर पोलिसांनी आणली राजस्थानातून परत..


पनवेल वैभव / दि.२०(संजय कदम): पनवेल शहरातील कोळीवाडा परिसरातून चोरीस गेलेली महागडी बुलेट मोटारसायकल पनवेल शहर पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या आधारे शोध घेत राजस्थान येथून परत आणली आहे.  
            शहरातील कोळीवाडा परिसरातून महेश भोईर यांनी ७० हजार रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल ही अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. सदर तक्रारीची दाखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मिथुन भोसले, अशोक राठोड, पोलीस हवालदार अमोल पाटील, पोलीस शिपाई विशाल दुधे, जगताप आदींच्या पथकाला गुप्तर बातमीदाराकडून सदर गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपीची माहिती मिळाली. व सदर मोटारसायकल राजस्थान येथील  बिकरणी या गावात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार सदर पथकाने तेथे जाऊन सदर बुलेट ताब्यात घेतली आहे.
Comments