तरुणी बेपत्ता....
पनवेल / दि.३०(वार्ताहर): कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली एक तरुणी अद्याप घरी न परतल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कु. मानसी नरेंद्र महाले (वय १८ वर्षे ११ महिने) असे या तरुणीचे नाव असून ती रंगाने सावळी, केस लांब खांदयापर्यत वाढलेले, नाक सरळ, डोळे काळे, एक दात उजव्या बाजूस पुढे आलेला, डोळयावर चष्मा, सोबत फुलांची डिझाईन असलेली किम रंगाची बॅग, उंची अंदाजे ४ फुट, अंगात नेसून गुलाबी रंगाचा टॉप, पांढरी लेगीज, पायात चप्पल आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे क्र.०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस हवालदार ए.एस. डोईफोडे यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो: कु.मानसी महाले