प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयुष्मान भारत कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न ; मा. सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा पुढाकार..
 मा.सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा पुढाकार..


पनवेल वैभव/ दि.१६(वार्ताहर): पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष करंजाडे, माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी मोफत आयुष्मान कार्ड व आयुष्मान भारत कार्ड वाटप कार्यक्रमाचे उदघाट्न प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या शिबिराचा करंजाडेकरांनी लाभ घेतला.
            यावेळी आशा वर्कर प्रगती व शीतल कदम यांनी हा शिबीराला सहकार्य केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाला मंगेश बोरकर, माणिक गायकर, सुरेश भोईर, संतोष पाडेकर, योगेश राणे, उमेश भोईर, धोंडू भोईर, विजय आंग्रे, हरेश आंग्रे, सनी आंग्रे, नीलम मोहन भगत, हेमा गोतमारे मॅडम, नसीम गुलाम शेख दीदी, मनीषा शंकर सुरवसे, शशांक पोईपकर, केतन आंग्रे, संदीप नागे, मोहम्मद अन्सारी, प्रीतम फडके, महेंद्र गायकर, अक्षय गायकवाड, सागर भोईर आदी उपस्थित होते. केंद्राच्या आयुष्मान भारत योजनेद्वारे पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. दुसरीकडे राज्यात महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येतच होती. आता या दोन्ही योजना एकत्र करण्यात आल्या असून, दोन्ही योजनांचे मिळून एकच आयुष्मान कार्ड देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच शिधापत्रिकाधारक आणि महाराष्ट्र राज्याचे रहिवास प्रमाणपत्र असणाऱ्यास या योजनेचा फायदा होणार आहे. या अनुषंगाने करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने मोफत आयुष्मान कार्ड व आयुष्मान भारत कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी करंजाडेतील नागरिकांनी या शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.
फोटो: आयुष्यमान भारत कार्ड वाटप
Comments