पनवेल शहर पोलिसांनी रिक्षा मध्ये हरवलेली बॅग महिलेला केली सुपूर्द...
        हरवलेली बॅग महिलेला केली सुपूर्द...

पनवेल दि.१८(संजय कदम): सणासुदीच्या दिवसामध्ये एका महिलेची रिक्षा मध्ये हरवलेली बॅग पनवेल शहर पोलिसांनी संपूर्ण सामानासह मिळवून दिली. त्याबद्दल त्यांनी पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले आहेत. 
            एक महिला रिक्षा मध्ये बॅग वसरली होती. या बॅगेत दोन मोबाईल, पैसे आणि दोन सोन्याचे कानातले होते. बॅग हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पनवेल शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश खरात आणि डीटेक्शन ब्रांच चे तांत्रिक विश्लेषक विशाल दुधे यांनी योग्य ती माहिती घेऊन, रिक्षावाल्याला नंबर ट्रेस करून, त्यांना पोलिस स्टेशन मध्ये घेऊन आले. रिक्षावाल्यांच्या सांगण्यानुसार तीन लेडीज त्यांच्यानंतर बसल्या होत्या आणि कदाचित त्यांनी बॅग घेतली असावी असा निष्कर्ष काढण्यात आला, ह्या माहितीची विशाल दुधे यांनी पुष्टी करून त्यांचा शोध सुरू केला. जवळपास महिनाभर त्यांचा शोध सुरू असून पोलिसांनी तांत्रिक तपासद्वारे या महिलांचा शोध घेऊन बॅग सहित, दोन्ही मोबाईल आणि सर्व सामान प्राप्त करून सदर महिलेला मिळवून दिली. त्याबद्दल सदर महिलेलने पनवेल शहर पोलिसांचे आभार मानले आहेत. फोटो: हरवलेली बॅग महिलेला सुपूर्द करताना पोलीस अधिकारी
Comments