पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चे उदघाटन ...
रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चे उदघाटन ...

पनवेल दि.१५(संजय कदम): पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे रस्ता सुरक्षा अभियान २०२४ चे आयोजन करण्यात आले असून याचे उदघाटन करण्यात आले. 
              
पनवेल शहर वाहतूक शाखा तर्फे रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे पळस्पे फाटा येथे उदघाटन करण्यात आले. यावेळी जड अवजड वाहनाचे 40-50 चालक तसेच स्थानिक नागरिक व वाहन चालक असे उपस्थित होते . यावेळी वाहन चालक व नागरिकांना रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे अनुषंगाने जनजागृती करण्यात आली असून याना वाहतुकीचे नियमाचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
फोटो: रस्ता सुरक्षा अभियान २०२४
Comments