देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
शिवसेना नेते माजी मंत्री,खासदार अनंत गीते (उद्धव बाळासाहेब ठाकरे)


पनवेल दि.०५(संजय कदम):  देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल. निवडणूक कोणत्याही क्षणी लागू शकतात, त्यामुळे गाफील न राहता भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी आपआपसातील मतभेद मिटवा व एक दिलाने निवडणुकीला सामोरे गेल्यास आपला विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास आज खारघर येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात पनवेल, उरण, कर्जत विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नेते मा.खासदार अनंत गीते यांनी व्यक्त केले. 
              यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री, शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा प्रमुख मा आमदार मनोहर भोईर, जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा समन्वयक अनिल चव्हाण, पनवेल विधानसभा समन्वयक वैभव सावंत, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, नितीन सावंत, नरेश रहाळकर, महिला आघाडी प्रमुख सुवर्णा जोशी, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, युवासेना रायगड जिल्हाधिकारी पराग मोहित, उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, दीपक घरत, प्रदीप ठाकूर, शशिकांत डोंगरे, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, विश्वास पेटकर, रघुनाथ पाटील यांच्यासह उपजिल्हाप्रमुख ते उपविभागप्रमुखापर्यंत सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 
यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना नेते अनंत गीते यांनी सांगितले की, गद्दाराच्या विरोधात पहिले रणशिंग हे खारघरमध्ये फुंकले गेले म्हणून आज येथे पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्यावर रायगड जिल्हयातील सहा व मावळ मतदार संघातील तीन अश्या नऊ आमदार व दोन खासदारांच्या निवडणुकीची जबाबदारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोपवली आहे. या जबाबदारीची परत फेड नऊ आमदारांसह दोन खासदार निवडून आणून देणारच असा शब्द त्यांना मी दिला आहे. तो आपल्या साथीने मला शब्द पूर्ण करायचा आहे. त्यासाठी दिवसरात्र एक करून पक्ष वाढीसाठी सर्वानी काम केले पाहिजे. भाजपच्या प्रलोभनांना भुलून आत्ताजरी त्यांना मतदान होत असले तरी आगामी महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये इंडियाचा विजय निश्चितच आहे. होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम यशस्वी झाला त्यामुळे ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणात आपण जिंकू शकलो आता होणारी लोकसभा तसेच पदवीधर निवडणूक असून ती गांभीर्याने घेऊनच आपल्याला एकत्रितपणे लढून जिंकायची आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.



फोटो: शिवसेना नेते अनंत गीते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image