पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने मच्छिमार बांधव व कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व बैठक संपन्न ...
 आरोग्य तपासणी शिबिर व बैठक संपन्न ...


पनवेल दि. २६ ( संजय कदम ) :  पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील केळवणे गाव ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मच्छिमार बांधव व कुटुंबियांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाणेच्या वतीने व ओम हेल्थ कॆअर सेंटर कामोठे यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबिर व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
                          वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित तपासणी शिबिरामध्ये बीपी ,शुगर , प्रोटिन्स टेस्ट, इत्यादी आजारांबाबत तपासणी करण्यात आली आहे. सदर शिबिरात एकूण 22 मच्छीमार बांधव, कुटुंबीयांनी सहभाग घेतला होता . यावेळी आयोजित बैठकीमध्ये सागरी सुरक्षेच्या दृष्टीने संशयित बोटी, ड्रोन, अनोळखी इसम, वाहन, तसेच बेवारस वस्तू, ईत्यादी  माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशनचे लॅंड लाईन क्र 02227452444 , व कोस्टल हेल्पलाईन क्रमांक 1093 यावर संपर्क साधावा याबाबत तसेच इतर महत्वाच्या देण्यात आल्या आहेत.सदर आरोग्य तपासणी शिबीर व सागर रक्षक बैठक पोनि जगदीश शेलकर यांनी घेतली होती. या बैठक व वैद्यकीय तपासणी शिबिराला उत्फुर्त प्रतिसाद मिळाला . 




फोटो - आरोग्य शिबीर
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image