रोटरी पनवेल फेस्टिव्हल कलाकारांना शुभेच्छा..
पनवेल दि २४ (वार्ताहर) : पनवेल मध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून गेली 26 वर्षे पनवेल फेस्टिवल चे आयोजन करण्यात येत आहे. "पनवेल फेस्टिवल 2023" पनवेल येथे सुरू झाले आहे. पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी फेस्टिवल ला भेट दिली. फेस्टिवल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
कलाश्रुती अकॅडमी च्या माध्यमातून पनवेलच्या वृषाली पाटकर यांच्या नियोजनात पनवेल मधील कलाकारांनी "धरोहर" पहचान भारत के इतिहास की या नृत्यअविष्काराचे सुंदररीत्या सादरीकरण केले. यात भारतातील विविधतेने नटलेल्या आपल्या रूढी, परंपरा आणि एकात्मता आपल्या कलेतून उत्तम प्रकारे सादर केले. फेस्टिवल मध्ये शेकडो प्रकारचे स्टॉल आहेत तेथील विविध स्टॉल्सला त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू आणि चविष्ट खाद्यपदार्थ यांचा त्यांनी आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत शेकाप जिल्हाचिटणीस गणेश कडू, पनवेल रोटरी फेस्टिव्हल 2023 चे चेअरमन शिरीष पिंपळकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल चे पी.आर. डायरेक्टर उन्मेष लोहार , पास्ट प्रेसिडेंट शिरीष नांदेडकर, ज्येष्ठ रोटरीअन अमर म्हात्रे, राजाभाऊ गुप्ते आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पनवेलकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट : गेली 26 वर्ष रोटरी क्लब पनवेल सातत्याने पनवेल फेस्टिवलचे उत्कृष्टरित्या आयोजन करत आहे. आज या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पनवेलच्याच कलाश्रुती अकॅडमीच्या कलाकारांनी भारतातील विविधतेचे दर्शन एकाच मोठ्या व्यासपीठावर प्रथमच सादरीकरण अत्यंत उत्कृष्टरित्या केले.अशा प्रकारचे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ पनवेलला माझ्या शुभेच्छा:-
प्रितम जनार्दन म्हात्रे
(मा.विरोधी पक्षनेते, प. म.पा.)
फोटो - पनवेल फेस्टिव्हल