पनवेल येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत ३,६५१ प्रकरणे निकाली...
लोक अदालतीत ३,६५१ प्रकरणे निकाली...
 

पनवेल दि १० (संजय कदम) :  दखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या  पनवेल येथील न्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वाद पूर्ण आणि  दाखल अशी  एकूण ३,६५१ प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे. अशी माहिती अध्यक्ष,तालुका विधी सेवा समिती, पनवेल तथा जिल्हा न्यायाधीश माननीय श्री. जयराज वडणे साहेब यांनी दिली.
             राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात वाद पूर्ण प्रकरणे ठेवण्यात आली होती. पनवेल येथील न्यायालयात आयोजित केल्या गेलेल्या लोक अदालतीमध्ये वादपुर्व प्रकरणे  व प्रलंबित अशी एकूण १२,२३३  प्रकरणे लोक अदालती मध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी वादपूर्व प्रकरणे ३,०१७  आणि प्रलंबित खटल्यांपैकी ६३४ प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. व त्याद्वारे पक्षकारांना एकूण ३ कोटी ६६ लाख  ४७ हजार 55.६६ रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे. पनवेल येथील न्यायालयात ६ लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालती मध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून देखील प्रकरणे मिटवण्यात आली. या लोकन्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग , महानगरपालिका, बँक, पोलीस प्रशासन, आणि सर्व पक्षकार यांनी भरगोस असा प्रतिसाद दिला. त्याबद्दल अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती पनवेल यांच्यावतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.



फोटो -  पनवेल न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत
Comments