भारतीय संस्कृती ही सहसंस्कृतीचा आधार - मंगला खाडीलकर
भारतीय संस्कृती ही सहसंस्कृतीचा आधार - मंगला खाडीलकर..

पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः   भक्त आणि भगवंत यांना एकाच पातळीवर आणणारी भारतीय संस्कृती ही सहसंस्कृतीचा आधार आहे.देव आणि नाम भक्ती आणि भावार्थाच्या रुपाने एकत्र येतात तिथे मिळणारं ज्ञान म्हणजे सच्चिदानंद,या ज्ञानाच्या अपेक्षेनेच माणूस जगत असतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडीलकर यांनी नवीन पनवेलच्या आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे आयोजित आठवणींच्या साठवणी  कार्यक्रमाच्यावेळी नवीन पनवेल येथे केले. 
यावेळी अत्रे कट्ट्याचे प्रमुख संयोजक अरविंद करपे उपस्थित होते. यापुढे बोलताना त्या म्हणाल्या, कलाकार,निवेदक व प्रेक्षकांविषयी बोलताना त्या म्हणाल्या,कलाकाराने समोरच्या रसिकांची बूज ठेवली पाहिजे.आपण रसिकांसाठी नसून रसिक आपल्यासाठी आहेत,त्यांच्यामुळेच आपण जिवंत आहोत हे कलाकाराने पक्के ध्यानात ठेवावे.आपल्या देहबोलीतून आपल्याला काय सादर करायचं आहे हे रसिक चाणाक्षपणे ओळखतात त्यामुळे कलाकाराने आपले व्यक्तिमत्व रुजू व संयमी ठेवले पाहिजे. आपल्यावर होणारी टीका ही नकारात्मकतेने घेणे ही पराभवाची पहिली पायरी आहे याची जाण ठेवून सादरीकरणात सुधारणा केल्या पाहिजेत .
निवेदकाची नाळ रसिकांशी असावी.आपल्यामुळे कार्यक्रमाची उंची वाढणार आहे हे लक्षात घेऊन त्याने दूधात विरघळणा-या साखरेप्रमाणे कार्यक्रमात समरसून जात निवेदन करावे असे सांगितले.
कार्यक्रम व रंगमंच या इतक्या पवित्र गोष्टी आहेत की कलाकाराने आपल्या सर्व झुली बाजूला ठेवून रसिकांशी कलेतून संवाद साधावा तर रसिकांनी मनात कोणताही किंतू न आणता समोर घडतंय त्याचा आनंद घ्यावा. कुसुमाग्रज, सुरेश भट, व.पु.काळे, सदानंद डबीर, शंकर वैद्य, अटलबिहारी वाजपेयी, अमिताभ बच्चन आदी दिग्गजांच्या,आयुष्याचा अर्थ सांगणा-या साठवणीतील आठवणींनी रसिक भारावून गेले.
  

फोटो ःआचार्य अत्रे कट्टा
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image