डॉ. शुभदा नील यांचा राष्ट्रीय प्रशंसा पुरस्काराने गौरव..
डॉ. शुभदा नील यांचा राष्ट्रीय प्रशंसा पुरस्काराने गौरव..

पनवेल / प्रतिनिधी - : 10 डिसेंबर रोजी इंडियन फर्टिलिटी सोसायटी, 2023, दिल्ली-एनसीआरच्या 19 व्या वार्षिक परिषदेत नवीन पनवेल येथील बीके डॉ. शुभदा नील, संस्थापक आणि संचालक, होलिस्टिक आयवीएफ आणि आययुआय यांना आयवीएफ आणि आययुआय ची गुणवत्ता वाढवण्याच्या प्रयत्नांसाठी राष्ट्रीय प्रशंसा पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार अध्यक्ष डॉ के डी नायर, महासचिव डॉ सुरवीन घुमान, डॉ पंकज तलवार अध्यक्ष इलेक्ट आयएफएस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
       मेडिटेशन द्वारा आयवीएफ आणि आययुआय चा उपचार घेणाऱ्या दाम्पत्यांना ताण तणाव कमी होवून, आयवीएफ आणि आययुआय ची गुणवत्ता वाढवण्यास मदत होते, ह्यावर डॉ. शुभदा नील ह्यांनी प्रबंध सादर केला. ह्या वेळी होलिस्टिक आयवीएफ आणि आययुआय गाइड हे पुस्तक सुद्धा प्रकाशित करण्यात आले जे सर्वांसाठी डिवाइन गर्भसंस्कार ह्या वेबसाईट वर निःशुल्क उपलब्ध आहे.
Comments