जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान...
रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान...


पनवेल दि ११ (संजय कदम ): जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे मार्गदर्शक बबन बारगजे यांनी रायगडचे भाग्यविधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षपदी भगवान जायभाय यांना नियुक्तीपत्र दिले . त्याच बरोबर उपसचिव पदी पप्पू सोनवणे यांनाही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 
                 यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष आंधळे, सचिव हनुमंत विघ्ने, उपाध्यक्ष अर्जुन डोंगरे उपस्थित होते. जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत व अशा समर्पित कार्यकर्त्यांसाठी जय गोपीनाथ प्रतिष्ठान ही संस्था म्हणजे खुले व्यासपीठ आहे . प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची संधी अशा लोकांना मिळत असते जे स्वतःहून आपलं योगदान देऊ शकतात . त्यामुळे अनेक नवीन नवीन उपक्रम राबवून संस्था नावारूपास आलेली आहे . संस्थेमार्फत अनेक गोरगरिबांना व असंघटित लोकांना मदत करण्यास पदाधिकारी पुढे येऊन काम करतात . वंचित समाजासाठी काम करणारी संस्था म्हणून कमी कालावधीमध्ये जय गोपीनाथ प्रतिष्ठानने आपले महत्त्व अधोरेखित केलेले आहे .  संस्थेचे मार्गदर्शक  बबन बारगजे यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना नेहमी पाठबळ दिले जाते व या कामी लोकनेते माजी खासदार  रामशेठ ठाकूर , आमदार प्रशांत ठाकूर यांचेही नेहमीच आम्हाला मोलाचे सहकार्य लाभते असे अध्यक्ष सुभाष आंधळे यांनी सांगितले . त्यामुळे आम्ही पनवेल तालुक्यामध्ये प्रतिष्ठानची व्याप्ती वाढवलेली आहे असे प्रामाणिकपणे संस्थेचे सचिव हनुमंत विघ्ने यांनी सांगितले.



फोटो - लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image