पनवेल महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात काँग्रेस पक्षासह स्थानिक नागरिकांचा धडक मोर्चा....
काँग्रेससह स्थानिक नागरिकांचा धडक मोर्चा....

पनवेल दि.१७(संजय कदम): पनवेल महापालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात काँग्रेस पक्षासह स्थानिक नागरिकांचा आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान अहमद खान यांच्या मार्गदर्शनाखाली व पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल शहरातील काँग्रेस भवन ते पनवेल महापालिका कार्यालयापर्यत धडक मोर्चा काढण्यात आला. 
       
यावेळी काँग्रेसचे कोकण प्रभारी प्रभात झा, पनवेल प्रभारी तेजस घोलप, महिला अध्यक्ष निर्मला म्हात्रे, पनवेल अध्यक्ष लतीफ शेख, प्रदेश सचिव विश्वजित पाटील, प्रितेश साहू, अभिजित पाटील, सुरेश पाटील, अभिजित मुंडाक्कल, राहुल सावंत, काशीफ इमाम, शशिकला सिंग, आरती ठाकूर, शशिकांत बांदोडकर, सतीश मोरे यांच्यासह स्थानिक नागरिक तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
पनवेल महानगरपालिका अस्थितवात येऊन ७ वर्ष होऊन देखील सर्व सामान्य नागरिकांचे प्रेय पायाभूत प्रश्न सुटले नाहीत. २३ गावे जी महानगरपालिके मध्ये घेतली त्यांना ना पाण्याची व्यवस्था, ना सिव्हरेज गटारची व्यवस्था होऊ शकली. तसेच विद्युत पुरवठा देखील संपूर्ण महानगरपालिकेत वारंवार खंडीत होत आहे. कचऱ्याची समस्या देखील फार मोठी आहे. महानगरपालिकेमध्ये मागील १ वर्षा पासून प्रशासक नेमले असून सर्व कामे ही अनागोंदी पद्धतीने सुरू आहेत. या सर्व बाबींवर प्रशासनाचा दुर्लक्ष होत असून सामान्य जनतेच्या कर स्वरूपात दिलेले पैसे हे व्यर्थ जात आहेत. या समस्यांबाबत हा मोर्चा काढण्यात आला होता.

कोट: 
महानगरपालिकेने लवकरात लवकर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर संतप्त जनतेचा या पेक्षा मोठ्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात येईल- पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमराज म्हात्रेफोटो: काँग्रेस मोर्चा
Comments