सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाची हॉटेलवर कारवाई...
सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाची हॉटेलवर कारवाई...

पनवेल दि.२८(वार्ताहर): खारघर मध्ये सिडकोच्या अनधिकृत नियंत्रण बांधकाम विभागाच्या वतीने येथील सेक्टर 10 मधील निरसूख पॅलेस हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर आज कारवाई करण्यात आली आहे. सिडकोच्या जागेवर विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली. यावेळी सिडकोचे पथक पोलिसांचा मोठा फौजफाटा, जेसीबीच्या साहाय्याने घटनास्थळी दाखल झाले होते.
            अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिकारी लक्ष्मीकांत डावरे यांच्या मार्गदर्शनात हि कारवाई करण्यात आली. खारघर शहरात सिडकोच्या 48 पेक्षा जास्त भूखंडावर भूमाफियांनी कब्जा केला आहे. सिडकोची मोहीम थंडावल्याने शहरात अनधिकृत बांधकामांना पेव फुटले आहे. सिडकोने या कारवाईत सातत्यता ठेवण्याची मागणी होत आहे.




फोटो: निरसूख पॅलेस हॉटेलवर करण्यात आलेली कारवाई
Comments
Popular posts
नगरसेविका ममता प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली “सखी कर्तृत्वाचा सन्मान” उत्साहात...
Image
२४ तासाचे आत घरफोडीचे ३ आरोपी अटक करून गुन्हे शाखेने ३६ लाख किंमतीचे दागिने केले हस्तगत...
Image
मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्पाइन क्लिनिक सुरू ; पाठदुखी - मणक्याच्या विकारांवर तज्ञांकडून प्रभावी उपचार..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)ग्राहक संरक्षण कक्षातर्फे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा वेळेवर करण्याची गॅस एजन्सीकडे मागणी ....
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image