८३ नळ चोरणारा पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात....
८३ नळ चोरणारा पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात....  


पनवेल दि.२७(संजय कदम): एकाच सोसायटीमधील FIYA कंपनीचे वेगवेगळ्या मॉडेलचे ८३ नळ चोरणाऱ्या गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
            
पनवेल तालुक्यातील मोरबे गाव येथील सहकार द्वार गृहनिर्माण सोसायटीमधील ४१ फ्लॅट मधून FIYA कंपनीचे वेगवेगळ्या मॉडेलचे ८३ नळ ज्याची किंमत जवळपास ४१,३५० रुपये इतकी होती ते चोरीस गेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार विजय देवरे, महेश धुमाळ, सुनील कुदळे, व पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्तबातमीदाराच्या आधारे आरोपी सिद्धेश सुरेश मोर्ये(वय २८) याला त्या परसरातून ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Comments