बेशिस्त व अवैध पार्किंग बाबत कळंबोली वाहतूक शाखेतर्फे वाहन चालक व मालक यांना समज...
गैरप्रकार व तक्रारी प्राप्त झाल्यास कारवाई करणार - वपोनी हरिभाऊ बानकर
पनवेल / प्रतिनिधी :
कळंबोली वाहतूक शाखेच्या हद्दीतील सायन पनवेल महामार्गावरील मॅकडोनाल्ड या ठिकाणी खाजगी बसेस तसेच इतर वाहने हे बेशिस्तरीत्या व अवैधरीत्या पार्क होत असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याबाबत विविध राजकीय संघटना, स्थानिक पदाधिकारी, एसटी महामंडळ यांचे कडून तसेच ट्विटर द्वारे तक्रारी प्राप्त होत आहेत.
तक्रारीच्या अनुषंगाने कळंबोली वाहतूक शाखेकडून वाहन चालक यांच्यावर दररोज कारवाई जोरात सुरू आहे. त्याच दरम्यान पुन्हा एकदा वाहन चालक तसेच खाजगी बस मालक व चालक यांची कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांनी कळंबोली वाहतूक शाखा येथे बैठक घेतली. 

सदर बैठकीत त्यांना नमूद ठिकाणी विनाकारण वाहने थांबू नये तसेच अस्ताव्यस्त पार्किंग करून वाहतुकीची कोंडी न करणे, अवैधरित्या प्रवासी वाहतूक करू नये, टप्पा वाहतूक करू नये, वाहतूक नियमांचे पालन करावे इत्यादी बाबत समक्ष सूचना दिल्या यापुढे असे गैरप्रकार दिसून आल्यास व त्याबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी समज देण्यात आलेली आहे. या बैठकीस एकूण 28 ते 30 मालक व चालक उपस्थित होते.
Comments