बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
पनवेल बस स्टँड येथून अटक...
पनवेल/प्रतिनिधी :--  पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील शनिवारी दि. १८ रोजी पनवेल बस स्टँडच्या परिसरात बांग्लादेशी नागरीक कामाच्या शोधात संशयीतरीत्या फिरत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस पथकांनी पनवेल बस स्टैंड येथे जावुन बातमीची सहानिशा करुन इसम नामे १) अली सफीज शेख, २) रविवुल मनन शेख व ३) मेसन किसलू मुल्ला यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे भारतीय नागरीकत्वावावत कागदपत्रांची चौकशी केली असता त्यांच्याकडे भारतीय नागरीकत्वावावत कागदपत्रे नसल्याचे आणि ते बांगलादेशी नागरिक असल्याची खात्री झाली, वरील आरोपी विरोधात पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ६३१/२०२३ पासपोर्ट अधिनियम १९६७ चे कलम ३(अ), १२(क) सह विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपीना गुन्हयात अटक केली आहे.

गुन्हयातील आरोपी पोलीस कोठडी रिमांड मध्ये असताना तपासात बंगाली भाषेचे छायांकित कागद प्राप्त झाले. प्राप्त कागद वंगाली भाषाचे अवगत असलेले पोलीस मित्रांना दाखवुन त्यांच्याकडून कागदातील माहिती समजुन घेतली असता वांगलादेश मध्ये नरईल जिल्हयातील कालिया पोलीस ठाणेच्या अभिलेखावर दि. २९/०९/२०२३ रोजी गुन्हा रजि. नं. २४३/२०२० दंड विधान संहिता १८६० चे कलम ३०२, ३४ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे आणि गुन्हयामध्ये पाहिजे आरोपी नामे १) अली हाफीज शेख, २) रविवुल मनन शेख हे संशयीत आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तरी प्राप्त बातमीची पोलीस पथक पुढील कार्यवाही करित आहे.

सदरची कार्यवाही पोलीस उपआयुक्त पंकज डह्मणे, परिमंडळ ०२, पनवेल व सहा. पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री अंजुम वागवान व पोलीस निरीक्षक (प्रशा) श्री प्रविण भगत, सपोनि प्रकाश पवार, पोउपनि/अभयसिंह शिंदे, पोहवा/९३५ नितीन वाघमारे, पोहवा/१३७८ अविनाश गंथडे, पोहवा/२०६८ परेश म्हात्रे, पोना/२७०५ रविंद्र पारधी, पोना/२२३९ अशोक राठोड, पोशि/३७९१ संतोष दाहिजे, पोशि/१२३८७ नितीन कांबळे व पोशि/४१२९ साईनाथ मोकल यांनी केली आहे.
Comments