वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर कळंबोली वाहतूक पोलिसांचा ऍक्शन प्लान..
मोकळ्या भूखंडावर वाहने पार्क करावीत ...
साहित्याची विक्री सार्वजनिक रहदारीचे रस्त्यावर अथवा फुटपाथवर करू नये..

कळंबोली/प्रतिनिधी -- कळंबोली वाहतूक शाखेच्या हददीतील कळंबोली, कामोठे व खांदेश्वर परिसरातील सर्व नागरीक, व्यापारी, हॉटेल चालक/मालक व व्यावसायिक आस्थापना यांना आवाहन करण्यात आले आहे की दि. १०.११.२०२३ पासून दिपावली सण साजरा होणार असून त्या अनुषंगाने नागरीकांची खरेदीकरीता मुख्य व इतर बाजारपेठामध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. सदर खरेदीकरीता येणारी वाहने मुख्य रस्त्यावर पार्क करण्यात येत असल्याने तसेच काही व्यापारी देखील फुटपाथ व त्यालगत असलेल्या रोडवर त्यांचे साहित्य विक्री करीत असल्याने सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने सर्व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे साहित्याची विक्री सार्वजनिक रहदारीचे रस्त्यावर अथवा फुटपाथवर करू नये. 

तसेच कळंबोली हददीतील येणारी खाजगी वाहने ही एम.एस.ई.बी लगत असलेल्या मोकळया भुखंडावर पार्क करावीत. कामोठे हददीतील वाहने ही कामोठे पोलीस ठाणे समोरील असलेल्या मोकळया भुखंडावर पार्क करावीत. तसेच शक्यतो नागरीक यांनी त्यांचे खाजगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक सेवांचा वापर करावा. जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही व दिपावली सण सुखरूपपणे पार पडेल.

हरीभाऊ बानकर-पोलीस निरीक्षक,
कळंबोली वाहतूक शाखा, नवी मुंबई
Comments