तालुका विधी सेवा समितीच्या वतीने पनवेल न्यायालय परिसरात राबवली स्वच्छता मोहीम....


पनवेल कोर्ट आवारात “स्वच्छतेसाठी श्रमदान”. 

पनवेल (प्रतिनिधी) स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून “एक कदम स्वच्छता कि ओर”  म्हणत “स्वच्छतेसाठी श्रमदान” या संकल्पनेतून पनवेल जिल्हा व सत्र न्यायालय व  तालुका विधी सेवा समितीच्या वतीने कोर्ट आवारात शनिवारी एकदिवसीय श्रमदान आयोजित केले होते. यावेळी सर्व स्तरीय न्यायाधीश, पनवेल वकील संघटनेचे पदाधिकारी, वकील, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन श्रमदान केले.  
“स्व्छता हीच खरी सेवा”  हा मूलमंत्र घेऊन भारत सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालयाने “कचरामुक्त भारत”  बनवण्यासाठी हाती घेतलेल्या  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 15 सप्टेबर  2023 ते महात्मा गांधी जयंती दिन म्हणजेच 2 ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केले. या अभियानात शासकीय, निमशासकीय, खासगी अस्थापना, उद्योग या बरोबरच देशातील  सर्वच नागरिकांना  सहभागी होण्याचे आवाहन केंद्र शासनातर्फे केले होते. भारत सरकारने दिलेल्या या हाकेला साद देत जिल्हा व सत्र न्यायालयानेही एकदिवसीय श्रमदान अयोजीत केले होते. यावेळी उपस्थितांनी पनवेल कोर्ट परिसरात श्रमदान करून आंतर्बाह्य आवाराची साफ-सफाई, स्वच्छता केली.
पनवेल कोर्ट आवारात स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रमात पनवेल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा  जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जे. डी. वडणे, अतिरिक्त न्यायाधीश, के.जि. पाळदेवार, अतिरिक्त न्यायाधीश संतोष सी. शिंदे,  सहा.न्यायाधीश एस.आर. चव्हाण,  वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीम. एन.पी. पवार, के.एम.सोनावणे, श्रीम. ए.ए. गोडसे, ए. आर. गुन्नाळ,  कनिष्ठ स्तर न्यायाधीश एन.आर. इंदळकर, श्रीम. यू. वाय. बोराडे, श्रीम. सुशीला पाटील, एम.डी. सैंदाणे, श्रीम. एस.एस. मुजावर,  वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ, खजिनदार ॲड. धनराज तोकडे, ऑडीटर ॲड. विशाल मुंडकर,  कार्यकारिणी सदस्य ॲड. भूषण म्हात्रे, तालुका विधी सेवा समितीचे शैलेश कोंडाळकर, ॲड. राजेश खंडागळे, ॲड. विकी दुसिंग तसेच पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड आदी मान्यवर तसेच न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
Comments