'व्हिस्टा प्रोसेस फुड्स' चे उपजिल्हा रुग्णालयाला पाच लाखांच्या औषधाचे टॉनिक ; कंपनीचे सल्लागार तथा ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रशेखर सोमण यांचा पुढाकार..
ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रशेखर सोमण यांचा पुढाकार.
पनवेल / प्रतिनिधी :- 
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 'व्हीस्टा प्रोसेस फुड्स' तर्फे पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय कामाला गती यावी यासाठी तीन कम्प्युटर भेट देण्यात आले होते. परंतु हॉस्पिटल मधील असणारी प्रचंड गर्दी व औषधांचा तुटवडा लक्षात घेता कंपनीचे व्यवस्थापकीय सल्लागार व शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी कंपनीच्या सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणात औषधांची उपलब्धता करून देऊ असा शब्द दिला. कंपनीचे सीईओ भूपिंदर सिंग तथा बोर्डाने आवश्यक ती मंजुरी दिल्यानंतर व्हीस्टा प्रोसेस फुड्स ने आपला शब्द पाळत काल शनिवार 28 ऑक्टोबर रोजी उपजिल्हा रुग्णालयाला आवश्यक असणाऱ्या व गरीब गरजू रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या पाच लाखांच्या औषधांचे दान दिले. रायगड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्री अंबादास देवमाने हे स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते. कंपनीतर्फे कम्प्युटर औषधे व 2019 मध्ये देखील अशाच प्रकारे पाच लाख रुपये किमतीची औषधे कंपनीतर्फे देण्यात आल्याबद्दल कंपनीचे आभार मानण्यात आले. एवढ्यावरच न थांबता चंद्रशेखर सोमण यांनी मित्र मंडळाच्या सहाय्याने हॉस्पिटलमध्ये स्वखर्चाने सर्वात पहिले शव गृह चालू करून दिले होते त्याची आठवण करून देत नजीकच्या काळात 'शिवसेना पनवेल' व 'टिळक रोड मित्र मंडळ' यांच्या सहकार्याने हॉस्पिटलचे मोफत इलेक्ट्रिक व फायर ऑडिट देखील करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या व्यवस्थापनातर्फे हॉस्पिटलची ई.टी.पी प्रणाली देखील कार्यान्वित व दुरुस्त करून देणार असल्याचे यावेळी सोमण यांनी बोलताना जाहीर केले. ईटीपी प्रणालीची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री कदम हे देखील उपस्थित होते कदम यांनी ईटीपी प्रणाली तथा 25 मृतदेह सुस्थितीत ठेवता येतील असे 25 कप्प्यांचे शवागृह महिन्याभरात बांधून पूर्ण होणार असल्याची माहिती दिली. कितीही प्रयत्न केले तरी शेवटी शासकीय कामांमध्ये त्रुटी राहतात व त्या लक्षात घेऊन विविध कंपन्या, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व जागरूक नागरिक यांनी अशा प्रकारे पुढे येत हॉस्पिटल सारख्या महत्त्वाच्या विषयात आवश्यक ते छोटे-मोठे सहकार्य केल्यास गरीब गरजू रुग्णांना अधिकाधिक उत्तम सेवा देता येईल असे मत देवमाने यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी सोमण कुटुंबीय व शिवसेना तथा विस्टा कंपनी यांच्यातर्फे हॉस्पिटल उभारणीपासूनच आत्तापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या कार्यांचा उल्लेख केला. 
याप्रसंगी हॉस्पिटलचे अधीक्षक डॉक्टर पांचाळ, शिवसेनेचे उपमहागर प्रमुख महेश सावंत, उपशहर संघटक सिद्धेश खानविलकर, विभागप्रमुख आशिष पनवेलकर, किरण पवार, शाखाप्रमुख रमेश बेद, विस्टा कंपनीचे प्लांट मॅनेजर प्रवीण ठाकूर, मनुष्यबळ विभागाच्या इंद्रायणी आगीलावे, प्रथमेश पाटील, टिळक रोड मित्र मंडळाचे सदस्य विद्युत अभियंता श्रीकांत साठे, अविनाश सहस्त्रबुद्धे, पटवर्धन हॉस्पिटलचे प्रशासकीय प्रमुख सुनील लघाटे, हॉस्पिटलचे कर्मचारी व डॉक्टर्स इत्यादी उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य महामंडळातील संचित तोटा संदर्भात चौकशी करणेबाबत महामाहीम राष्ट्रपतींना निवेदन..
Image
'कमवा आणि शिका' उद्दिष्टाने कमवले “बार काउन्सिल ऑफ़ इंडिया” चे सदस्यत्व आणि 'मास्टर ऑफ लॉ' पदवी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन व कौतुक
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image
शिवबंधन बांधून शेकडो महिलांनी केला शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश...
Image