मोटारसायकलची चोरी ....
पनवेल दि. ०६ ( संजय कदम ) : पनवेल रेल्वे स्टेशनच्या समोरील रस्ताच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे .
सुनील गावंड यांनी त्यांची २० हजार रुपये किमतीची युनिकॉन डायजलऱ होंडा कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल क्रमांक एमएच ४५ के -६८५२ ही पनवेल रेल्वे स्टेशनच्या समोरील रस्ताच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे . याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .