ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी बसमध्ये प्रवेश दिला जात नसल्याबद्दल शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण कक्षाने केला संताप व्यक्त...
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाने केला संताप व्यक्त...


पनवेल दि.२७(संजय कदम): पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटी बसमध्ये प्रवेश दिला जात नसल्याबद्दल शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण कक्षाने केला संताप व्यक्त केला असून याबाबत त्यांनी आज पनवेल एसटी आगार कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन अश्या बस चालक व वाहकावर कारवाई करण्याची मागणी केली. 
तालुक्यातील दहिसर, रोहिजंण ते तळोजा दरम्यान शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी एसटी बस मधून प्रवास करीत असतात परंतु अनेक वेळा एसटी बस चालक वाहक या विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश देत नाहीत. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. या संदर्भात शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण कक्षाचे कक्ष जिल्हा सहसंघटक शशिकांत डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा प्रमुख सुनीत पाटील, सुबोध साळवी व इतर पदाधिकार्यांनी संबंधित पनवेल एसटी आगार कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन त्यांच्यासमोर विद्यार्थ्यांची बाजू मांडली व त्यांना काही बस गाड्यांचे नंबर सुद्धा देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे.
फोटो:  शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण कक्ष निवेदन
Comments