विवाहित महिलेच्या इंस्टाग्राम युसर आयडीवर अश्लील फोटो टाकणाऱ्या युवकास पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात...
 युवक पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात...पनवेल दि.१४(संजय कदम):  पनवेल परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेच्या इंस्टाग्राम युसर आयडीवर अश्लील फोटो टाकणाऱ्या युवकास पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात आहे.
कॉलेजमध्ये मध्ये शिकणारा हर्षद कुमार परमार (रा. गुजरात) याने पनवेल परिसरात राहणाऱ्या एका विवाहित महिलेच्या इंस्टाग्राम युसर आयडीवर अश्लील फोट टाकल्याने या बाबतची तक्रार सदर महिलेने पनवेल शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मागर्ग्दर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शेंडगे, पो हवा परेश म्हात्रे, पो हवा तुषार बोरसे व मपोशी देसाई या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे सदर तरुण हा गुजरात येथील नवगाव या ठिकाणी  वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेतले आहे.
Comments