शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षामध्ये वकिलांसह शिक्षित तरुणांचा जाहीर प्रवेश...
वकिलांसह शिक्षित तरुणांचा जाहीर प्रवेश...

पनवेल दि. २९ (संजय कदम  ): शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षामध्ये आज खारघर (घरकुल) येथील वकिलांसह शिक्षित तरुणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन जाहीर प्रवेश केला.त्याच्या प्रवेशाने खारघर मध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे . 
                  शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळोजा शहर प्रमुख मिथुन मढवी, युवासेना तळोजा शहर अधिकारी   तेजस पाटील यांच्या उपस्थितीत अॅडव्होकेट दीपेश पाटील, हर्षद राजू खुपते,आयुष शेलार,आर्यन पाटील,रितेश राव,शंतनू कदम,आदित्य आठवले,अक्षय ओवाल,विपुल सावंत,महेश सातपुते,राजू गरुड़,विशाल कांबळे ,सोहम पाटील ,राजू पाटील आदी तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असता त्याचे स्वागत शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी केले. 
फोटो - शिवसेना पक्ष प्रवेश
Comments