जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी...
पनवेल दि.२७(संजय कदम): पारगाव गावाच्या पुनर्वसन व पुनःस्थापनेबाबत तातडीने बैठक लावून पारगांव गावाला न्याय मिळवून देण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्याकडे ग्रामस्थांची केली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांची पारगाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच अहिल्या बाळाराम नाईक, उपसरपंच विश्वनाथ पाटील, माजी सरपंच तथा सदस्य निशा रत्नदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळाराम नाईक, माजी उपसरपंच सदस्य मनोज दळवी, मा. उपसरपंच सदस्य अंजली कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष सदाशिव पाटील, माजी उपसरपंच रत्नदीप पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सरपंच अहिल्या नाईक यांनी सांगिलते की, पारगाव ग्रामपंचायत हद्दीतील पारगांव व डुंगी गावास आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दगडमातीच्या भरावयाचे प्रमाण जास्तीत जास्त जमिनीपासून १५ ते २० फूट करण्यात आला आहे. या वर्षांच्या पावसाच्या पाण्यामुळे दोन्ही गावात पाणी साचून पूरपरिस्थिती दर वर्षा पेक्षा जास्त होणार आहे. दोन्ही गांव पाण्याखाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सन २०१७ ते आजतागातात येण्याच्या पावसाच्या पाण्यामुळे होण्याऱ्या पुराचे पाणी गावात शिरून अनेक घराचे नुकसान झाले आहे. परंतु यावर्षी संपूर्ण गाव बुडून जाऊन वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच तरी मा. नगरविकास प्रधान सचिव, सिडको एम.डी., जिल्हाधिकारी रायगड यांच्या समवेत पारगांव गावाला न्याय मिळवून द्यावा यासाठी लवकरात लवकर उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करावे तसेच पारगांव ग्रामसभेने पारगांव गावाचे पुनर्वसन सिडको शासनामार्फत करणेसंबंधीचा सर्वानुमते ठराव मंजुर केलेला आहे. त्यास अनुसरून ग्रामपंचायातीने उपरोक्त संदर्भ क्र. २ नुसार आपणांस विनंती अर्ज करून पारगाव ग्रामस्थांची जनभावना आपणांस कळविली होती. परंतु, आजमितीपर्यंत याबाबत आपण सकारात्मक भूमिका घेऊन तसे आम्हास लेखी कळविलेले नाही. ज्याअर्थी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासकामांमुळे पारगाव गावालगतच विमानतळाचा भराव झाला असल्याने मागील दोन तीन वर्षापासून प्रत्येक पावसाळयात पुरस्थिती निर्माण झालेली होती. तसेच, पारगाव गावालगतच असणाऱ्या डुंगी गावाबाबत गावा पुनर्वसन करणेबाबत शासन / सिडको स्तरावर सकारात्मक धोरण आखण्यात आलेले आहे. असे असताना पारगाव गावालाही तशा समस्या निर्माण झालेल्या आहेत याचा विचार करुन कोणताही भेदभाव न करता पारगाव गावाचे देखील पुनर्वसन व पुनःस्थापना होणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. पारगांव गावाचे पुनर्वसन का करावे. पारगांव गावात न.मु.आ.वि.ची विकास कामे (माती भरणीची कामे) चालु झाल्यापासुन तीन वर्षापासुन (२०१९ २०२० २०२१) प्रत्येक पावसाळयात दो-तीन वेळा भरतीचे पाणी पावसाचे पाणी गावात शिरत आहे. त्यामुळे ३०% घरांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. पारगांव गावाची समुद्र सपाटीपासुन लेवल ही आत्ता बनविलेल्या नाल्याच्या लेवल पासुन खाली आहे. तसेच नवी मुंबई आ.वि. ची लेवल ही गावाच्या लेवल पासुन ८ मिटरने वर आहे. नवी मुंबई आ.वि. तळाच्या भरावाच्या कामामुळे गावामधील जमिनीखालच्या पाण्याची लेवल सुध्दा वर आली आहे. त्यामुळे गावातील ३५% घरांना वालवी लागली आहे. काही ठिकाणी १५% घरांना ळमजल्यामधुन पाणी बाहेर येत आहे. आणि सांडपाण्याचा निचरा सुध्दा होत नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची टेकडी सपाटी करण्याच्या कामामुळे ब्लास्टींग केली जाते. त्या ब्लास्टींगमुळे गावातील ५० टक्के घरांना तडे गेले आहेत. तसेच ब्लास्टींग मुळे गावाच्या आजुबाजुला प्रदूषण होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान पूर्वे पासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरे खाडीपासुन ते दक्षिण उरण-पनवेल रोड पर्यत येणारी १२ गावामधुन तुम्ही १० गावे विस्थापीत केली आहेत. आणि एक गाव डुंगी विस्थापीत होण्याच्या मार्गावर आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानाच्या कामांमुळे (ब्लास्टींग आणि माती भरणीच्या कामांमुळे) गावाच्या आजुबाजुला धुळीचे साम्राज्य पसरलेले असून तसेच रात्री पण काम चालु असल्यामुळे तर अधिक प्रमाणात पर्यावरणात धुळीच्या कणांच्या थर तयार होत आहे. त्यामुळे गावातील नागरीक स्वशनाच्या आजारानी त्रस्त झाले आहेत, आणि त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पारगांव गावांनी जमिनीच्या स्वरुपात दिलेल्या योगदानाचापण विचार करावा. ज्याअर्थी, आपणांस यापुर्वीही वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील पारगाव गावाच्या पुनर्वसन व पुनःस्थापनेबाबत कोणतीही ठोस व सकारात्मक भुमिका आपण घेतलेली नाही. तरी वरील विषयाचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करुन पारगाव गावाचे पुनर्वसन व पुनः स्थापने करीता आपले स्तरावर योग्य ती कार्यवाही शक्य तितक्या लवकर करुन तसे आम्हास लेखी आश्वासन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. या मागणीचा जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर बैठक आयोजित करावी असे निर्देश संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
फोटो: जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांना निवेदन देताना ग्रामस्थ