भारत राष्ट्र समिती तर्फे विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत औषध वाटप...
आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप...
पनवेल  दि. 14/10/23 ( प्रतिनिधि ) 
भारत राष्ट्र समिती ( बीआरएस पार्टी ) पनवेल  तर्फे भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. के. चन्द्रशेखर राव यांच्या आरोग्य सवलतीच्या विचारानूरुप  तक्षशीला बुद्धविहार, सुकापुर - पालिदेवद विभागात 14 ऑक्टोबर, धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य  लक्षात घेऊन विभागातील सर्व नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिर आयोजित  करण्यात आले. 
या शिबिरामध्ये मोफत रक्तदाब, शुगर, ई.सी.जी. व गरजेनुसार पुढ़िल रक्त तपासनी  करण्यात आली. जनतेला आरोग्य विषयी मोफत समुपदेशन व  औषध वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे विभागातील नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले आणि शेकडो कुटुंबीयांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांचा प्रतिसाद पहाता संध्या ५.०० वाजता सुरु करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराची सांगता रात्री १०.०० वाजता करण्यात आली. कार्यकर्त्यानी शब्द टाकावा आणि तो शब्द क्षणाचा ही विलंब न करता लगेच कृतीत आणुन पुर्ण करणारे, भारत राष्ट्र समिती पार्टीचे लोकप्रिय पनवेल विधानसभा उप समन्वयक व पनवेल महानगर समन्वयक प्राध्यापक प्रफुल पंडीत भोसले व ॲड. निलमताई प्रफुल्ल भोसले आपल्या संपुर्ण परिवारा सोबत कार्यक्रमात सहभागी होते.
या वेळी मनोगत व्यक्त करतांना प्रा. भोसले यांनी मातोश्री होस्पीटल व सीमीरा  डायग्नोस्टीक्स चे डॉ. गणेश वाघचौरे साहेब आणि त्यांचे सहकारी डॉक्टर आशा मॅडम यांची संपुर्ण टीम व तक्षशीला बुद्धविहार कमिटी, सुकापुर- पलिदेवद येथील नागरिक यांचे आभार मानले आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवीत, आज पासुन पनवेल महानगरातील सर्व 20 प्रभागात नागरिकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिर शृंखलांचे आयोजन करणार आहोत असे संगितले. या कार्यक्रमास मा. नरेन्द्र गायकवाड़, विजय गायकवाड़, शैलेश गायकवाड़ व इतर सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. भारत राष्ट्र समिती पार्टी चे पलिदेवद वार्ड अध्यक्ष कृनाल कदम पनवेल विभागातील धडाडीचे कार्यकर्ते शशिकांत सातपुते, सतिश कर्डक, दयानंद वाघमारे, प्रशांत भोसले, निवेदन देठे, सचिन कदम आणि सर्व मित्र परिवार यांनी  विशेष मेहनत घेऊन आजचा कार्यक्रम नियोजन बद्ध पद्धतीने यशस्वीरित्या पार केल्या बद्द्ल सर्वाचे कौतुक केले व पुढे ही असेच सामजिक उपक्रम आपण भारत राष्ट्र समिती पार्टी च्या माध्यमातून पनवेल मध्ये घेत राहू असे आश्वासन दिले.
Comments