करंजाडे मधील अनधिकृत अतिक्रमांविरोधात होणाऱ्या कारवाई संदर्भात जाहीर आवाहन...
 कारवाई संदर्भात जाहीर आवाहन...

पनवेल दि.०४(संजय कदम): करंजाडे मध्ये होत असलेल्या अतिक्रमनाविरोधात आता  करंजाडे ग्रामपंचायत, पनवेल शहर पोलीस ठाणे व सिडको विभागाने एकत्रीत बैठक घेऊन कारवाईसंदर्भात जाहीर आहवन करणारे फलक लावले आहेत. 
       करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंग्रे, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, गोपनीय विभागाचे संजय धारेराव, सिडको अधिकरी श्री ठाकूर यांच्या झालेल्या बैठकीमध्ये करंजाडे नोड परिसरातील सर्व हातगाडया, पानटपऱ्या, फेरिवाले, आठवडा बाजार व इतर अनिधिकृत अतिक्रमणे यांचे विरुध सिडको अतिक्रमण विभाग पनवेल शहर पोलिस ठाणे व ग्रामपंचायत यांचे कडून दि. ०१/१०/२०२३ रोजी पासून कारवाई करण्यात येणार आहे तरी संबंधितानी याची नोंद घ्यावी सदर निर्णयाचे पालन करणे सर्वना बंधनकारक राहिल. आपल्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे. अश्या आशयाचे फलक करंजाडे वसाहत परिसरात लावण्यात आले आहेत. 



फोटो: आवाहन फलक
Comments
Popular posts
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
शिबिरात दिलेला शब्द उपचारापर्यंत जपला ; रुग्णांच्या भेटीला प्रितम म्हात्रे...
Image
गणेशोत्सव मंडपात गिरविले ‘सीपीआर’चे धडे ; मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे नागरिकांना सीपीआरचे प्रशिक्षण...
Image
रुग्णालयातून घरी गेल्यानंतर उपचारांसाठी मेडिकव्हरचा ‘होमवॉर्ड’ उपक्रम..
Image
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संस्कृती आणि परंपरेचा उत्सवी रंग ; ढोल-ताशांच्या गजरात अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
Image