कामधेनु फुडस् येथील कर्मचाऱ्याने प्रामाणिकपणे महिलेची सापडलेली पर्स केली परत...
कर्मचाऱ्याने महिलेची सापडलेली पर्स केली परत...


पनवेल वैभव / दि.२७(संजय कदम): नवीन पनवेल येथील कामधेनू फूड्स येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याने वाटेत त्याला एक लेडीज पर्स सापडली जी त्याने प्रामाणिकपणे परत दिल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याठिकाणी काम करणाऱ्या राहूल या कर्मचाऱ्याला रस्त्यामध्ये एक पर्स सापडली. त्याने ही बाब हॉटेल मालक सुनील अचोळकर व त्यांच्या मुलीला सांगितली. त्यांनतर त्यांच्या मुलीने पर्सची तपासणी केली असता त्या पर्समध्ये आधार, पॅन, वोटरकार्ड, स्टार हेल्थ चे कार्ड , रोख रक्कम, विदेशी डॅालर, डेबिट कार्ड वगैरे महत्वाची कागदपत्रे व पत्ता इंदौरचा होता. तसेच त्यामध्ये पनवेल येथील विजय सेल्सचे बिल होते. तीने लगेच विजय सेल्सची संपर्क करीत पर्सची मुळ मालकिण देवश्री नलावडेंना संपर्क केला. त्या लगेच कामधेनुत आल्या व ज्या राहूलला पर्स सापडली होती त्याच्या हस्तेच त्यांना सुपूर्द करण्यात आली. या प्रमाणिक पणाचे सर्वानी कौतुक केले आहे. 
फोटो: कामधेनू फूड्स
Comments