भूमिपूजन व मंथन हॉलचे नूतनीकरण ....
पनवेल वैभव / दि. २७ ( संजय कदम ) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ पनवेल कार्यालय येथे मध्यवर्ती मुद्देमाल कक्षाचे भूमिपूजन व मंथन हॉलचे नूतनीकरण नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत व पोलीस सह आयुक्त नवी मुंबई चे संजय मोहिते यांच्या हस्ते आज संपन्न झाले .
यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे , पोलीस सह आयुक्त नवी मुंबई चे संजय मोहिते , पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ पनवेलचे पंकज डहाणे , सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या सह परिमंडळ - २ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते . साधारण एक महिन्याच्या आत मध्यवर्ती मुद्देमाल कक्ष उभारला जाणार आहे . तसेच मंथन हॉलचे नूतनीकरण करण्यात आल्याने या ठिकाणी खात्या अंतर्गत विविध पोलीस ठाण्याच्या बैठका ,पत्रकार परिषद ,छोटे खानी कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येणार असल्याने या दोन्ही उपक्रमाचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कौतुक केले आहे . या निमित्ताने पोलीस सह आयुक्त नवी मुंबई चे संजय मोहिते यांचा वाढदिवस सुद्धा मंथन हॉल येथे केक कापून उपस्थित अधिकारी वर्गाच्यासाथीने साजरा करण्यात आला .
फोटो - मध्यवर्ती मुद्देमाल कक्षाचे भूमिपूजन व मंथन हॉलचे नूतनीकरण