नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सायबर गुन्हे जनजागृती मोहिम..
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सायबर गुन्हे जनजागृती मोहिम...


पनवेल वैभव /दि.२६(संजय कदम): नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सायबर गुन्हे जनजागृती करण्यासाठी व सायबर गुन्ह्यांस प्रतिबंध करण्यासाठी माझं शेजार व माझी जबाबदारी ही संकल्पना राबविण्यात येत असुन या संकल्पने अंतर्गत सायबर जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे.
       आपली शाळा, महाविद्यालय, सोसायटी, सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळे, स्वयंसेवी संस्था (एनजीओ) यांचेकरीता सायबर गुन्हे जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा असल्यास किंवा सायबर गुन्ह्यांबाबत कोणतीही माहिती प्राप्त करावयाची असल्यास किंवा सायबर गुन्ह्यांसंदर्भात नवी मुंबई पोलीसांशी संपर्क करायचा असल्यास QR कोड स्कॅन करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
फोटो: QR कोड
Comments