पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया .....
पाईपलाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया ; एमजेपीचे दुर्लक्ष... 


पनवेल दि.१२(वार्ताहर): नवीन पनवेल उपनगरातील रेल्वेरुळाला खेटून असणाऱ्या झोपडपट्टीलगतची जलवाहिनी मागील २४ तासांपासून फुटून त्यामधून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. एकीकडे मागील दोन दिवसांपासून सिडकोच्या विविध उपनगरांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद आहे. रहिवाशांवर पिण्याच्या पाण्याची सीलबंद बाटला खरेदी करण्याची वेळ आल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
नवीन पनवेल येथील पंचशील नगर झोपडपट्टीलगत असणाऱ्या एमजेपीची १३०० मीलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा फवारा या परिसरात उडाला आहे. मागील २४ तासांपासून हा फवारा सूरु असल्याने जलवाहिनी लगतच्या झोपड्यांंमध्ये पाणी शिरले आहे. दिड फुटापेक्षा अधिक पाणी या झोपड्यांमध्ये असल्याने या झोपड्यांमधील रहिवाशी पाण्यातच वास्तव्य करत आहे. एमजेपी प्रशासनाने सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस ३६ तासांचा शटडाऊन घेऊन विविध दुरुस्तीची कामे केली. मात्र पुन्हा जलवाहिनीतील पाण्याचा दाब वाढण्यासाठी अजून दोन दिवस लागणार आहेत. दुपारपर्यंत सिडकोच्या कळंबोली, नवीन पनवेल, काळुंद्रे, करंजाडे, खांदेश्वर वसाहत या परिसरात पाणी पुरवठा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र काही मिनिटेच पाणी पुरवठा झाला आहे.



फोटो: पाईपलाईन
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image