करंजाडे येथील अत्याधुनिक पद्धतीने उभारलेली पोलीस चौकी सर्वांसाठी उपयुक्त ठरणार- पोलीस उपायुक्त पंकज डहाणे..
      पोलीस उपायुक्त पंकज डहाणे....


पनवेल दि.२५(संजय कदम): करंजाडे परिसराचा वाढत विस्तार आणि लोकसंख्या  पाहता या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने पोलीस चौकी उभारणे गरजेचे होते व हे काम लोकसहभागातून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्याने याचा फायदा येथील नागिरकांना निश्चितच होईल असे मत पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ चे उपायुक्त पंकज डहाणे  यांनी पोलीस चौकीच्या उदघाटन प्रसंगी केले दरम्यान या पोलीस चौकीच्या नूतनीकरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन येथील कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. 
       या उदघाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त परिमंडळ - २ चे उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, करंजाडे सरपंच मंगेश शेलार, पोलीस पाटील कुणाल लोंढे, विभागीय अध्यक्ष कर्णा शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कामत, सहाय्यक पोलीस निरीक्षक खरात, पोलीस उपनिरीक्षक दाभाडे, पोलीस उपनिरीक्षक चौगुले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमंत अहिरे आदींसह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 





फोटो: पोलीस चौकी उदघाटन
Comments