गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केला गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा गाडीसह हस्तगत.....
सुगंधित तंबाखूचा साठा गाडीसह हस्तगत.....
पनवेल, दि.17 (संजय कदम) ः गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने खिडूूकपाडा गावाच्या हद्दीतील प्रशांत ढाब्यासमोरील स्टील मार्केटकडे जाणार्‍या रस्त्यावर एक गाडी अडवून त्यामध्ये असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा हस्तगत केला आहे.
गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे वपोनी उमेश गवळी यांना खास बातमीदाराकडून खिडूकपाडा गावाच्या हद्दीत गुटख्याचा साठा घेवून गाडी वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस हवालदार अनिल पाटील, पो.हवा.सचिन पवार, पो.हवा.निलेश पाटील, इंद्रजित कानू, सागर रसाळ, पोलीस शिपाई चालक विक्रांत माळी आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून एका इसमास गाडीसह थांबविले असता त्याच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गुटखा पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आल्याने त्याच्या विरोधात आरोग्यास अपायकारक असा महाराष्ट्रात विक्री, साठवणूक व वाहतुकीस प्रतिबंधित असलेला अन्नपदार्थ बेकायदेशीररित्या व मानवी शरिरास घातक व लोकजिवीतास धोका निर्माण करणार्‍या प्रतिबंधित अन्न पदार्थाचा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
Comments