गांजा सेवन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई....
गांजा सेवन करणाऱ्यांविरुद्ध केली कारवाई....


पनवेल दि.१८ (संजय कदम): पनवेल शहरातील करमअली दर्गा समोरील मोकळ्या जागेत गांजा सेवन करणाऱ्या एका इसमा विरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. 
         मुबारक इब्राहिम शेख (वय २३) रा.पटेल मोहल्ला हा सदर ठिकाणी गांजा सेवन करत असल्याची माहिती पनवेल शहर प्रतिबंधक पथकाला मिळताच सदर पथकाने तेथे जाऊन या इसमास ताब्यात घेतले आहे.
Comments