पनवेल महानगरपालिकेच्यावतीने घरगुती पर्यावरणपूरक गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन..
       गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन..


पनवेल,दि.१७ : माझी वसुंधरा ४.0 अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त पनवेलसाठी पनवेल महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गतच सणांचं पावित्र्य आणि पर्यावरणाचं भान राखलं जावं यासाठी आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा’ मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत 'घरगुती पर्यावरणपुरक गणपती सजावट स्पर्धा२०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी 810 810 1997 व्हाट्सअप क्रमांकावरती आपली नोंदणी करावी. 
नोंदणी करताना आपले पूर्ण नाव, मोबाईल नंबर, पत्ता, प्रभाग (खारघर / कळंबोली/ कामोठे/पनवेल), नोंदणी प्रकार (सार्वजनिक मंडळ /वैयक्तिक), गणेशमूर्तीचे प्रकार (शाडूची / इतर), गणेश मुर्ती स्थापनेचे दिवस माहिती(दीड / पाच/सात/ अकरा / एकवीस) ही सारी माहिती देणे आवश्यक आहे. याबरोबरच स्पर्धकांनी आपल्या घरातील गणेशोत्सवाचे फोटो आणि व्हिडीओ २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत पाठवावे. 


चौकट
• स्पर्धेकरिता खालील पारितोषिक निश्चित केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ :-
१. प्रथम पारितोषिक रक्कम रु.२५,०००/-
२. द्वितीय पारितोषिक रक्कम रु.२०,०००/-
३. तृतीय पारितोषिक रक्कम रु. १५,०००/-
घरगुती गणेशोत्सव :-
१. प्रथम पारितोषिक रक्कम रु. ७,०००/-
२. द्वितीय पारितोषिक रक्कम रु.५,०००/-
३. तृतीय पारितोषिक रक्कम रु.३,०००/-
चौकट 
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘बाप्पा माझा पर्यावरणाचा राजा ’ मोहिमे अंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक पाच जीवन शिक्षण विद्यामंदिर येथे नुकताच जनजागृती उपक्रम घेण्यात आला.आयुक्त गणेश देशमुख यांच्या संकल्पनेतून उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांच्या सहकार्याने प्रशासनाधिकारी कीर्ती महाजन यांच्या सूचनेनुसार गणेशाची सजावट पर्यावरणपूरक साहित्यांनी करण्यासाठी व पनवेल मनपा ने दिलेली पंचसूत्रीचा वापर करून गणेशोत्सव हा पर्यावरणाचे संतुलन राखत साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश रामचंद्र आलदर यांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सवासाठीच्या विशेष पत्रकांचे वाटप विद्यार्थ्यांना केले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image