कामधेनु गणेशोत्सव सोहळ्यात ‘इको फ्रेंडली गणपती' व आरास’ तसेच बर्फाचे शिवलिंग...
कामधेनु गणेशोत्सव सोहळ्यात ‘इको फ्रेंडली गणपती' व आरास’ तसेच बर्फाचे शिवलिंग...


पनवेल दि.२० (संजय कदम) : नवीन पनवेल येथील कामधेनू फूड्स या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदाही कामधेनू गणेशोत्सव सोहळ्यात ‘इको फ्रेंडली गणपती’ विराजमान झाले आहे तसेच यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे बर्फाचे शिवलिंग सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. 
              कामधेनु गणेशोत्सव सोहळ्याचे नियोजन दरवर्षी सुनील आचोलकर व त्यांचे कुटुंबीय तसेच सहकारी करीत असतात. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह चांदीच्या देवाऱ्यामध्ये बसवण्यात आलेली गणेशाची मूर्ती व त्याचा साजेसा असलेली फुलांची सजावट अनेक भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या गणेशाचे दर्शन मोठ्या प्रमाणात भाविकांनी घेतले आहे. यानिमित्ताने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. दरवर्षी अमरनाथ सेवा मंडळाच्या माध्यमातून सुनील आचोलकर हे शेकडो भाविकांना बाबा अमरनाथचे दर्शन घडवत असतात. त्यांच्यावर असलेल्या निस्सीम भक्तीमुळे ते दरवर्षी बर्फाचा शिवलिंग उभारतात. सदर शिवलिंग हे मुंबई येथील बादशाह हे मुस्लिम कलाकार उभारतात हे या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे.      फोटो :  कामधेनु गणेशोत्सव सोहळा
Comments