घराला लागली आग ; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही...
पनवेल दि.२९(संजय कदम): पनवेल शहरातील हॊटेल दत्तच्या मागील बाजूस असलेल्या घराला अचानकपणे आग लागून या आगीत घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही झाली.
हॉटेल दत्तच्या बाजूला असलेल्या शिवाजी वसाहत मध्ये राहणारे रवी तसेच त्यांचा भाऊ सचिन कीर यांच्या घराला काल सायंकाळी अचानकपणे आग लागली. या आगीत घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले या घटनेची माहिती मिटलाच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहचून त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
फोटो: अग्निशामक दल आग विझवताना