पनवेल तालुक्यातील वळवली येथील आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट..
आदिवासी बांधवांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट..
पनवेल ०७- पनवेल तालुक्यातील वळवली येथील आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी वळवली येथील  आदिवासी बांधव कसत असलेल्या जमिनी वर सिडकोने हक्क सांगून आदिवासी शेतकऱ्यांना बेघर केले आहे. त्या जमिनीवर आमची घरे आहेत, तसेच शेती ती नियमिंत  करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

मंत्रालयात झालेल्या या भेटीत मुख्यमंत्र्यांनी आदिवासी बांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी वळवली येथील सर्व्हे क्र.४९/०, खाते क्र.११२ मधील ४७.४४ हेक्टर शासकीय जमीन आदिवासी बांधव पूर्वजांपासून कसत आहेत. गावातील आदिवासी बांधवांचे हे उदरनिर्वाहाचे एकमेव साधन आहे. या जमिनीवरील घरे, तसेच शेती नियमानुकुल करण्याचे आदेश महसूल विभागाने यापूर्वी काढले आहेत. वळवली गाव सिडकोच्या अधिकार क्षेत्रात येत असल्याने महसूल विभागाने सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सिडकोकडे पाठविला आहे. हा प्रस्ताव सिडकोमार्फत अंतिम मंजूरीसाठी मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या अंतिम मंजूरीबाबत मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासोबत यावेळी चर्चा केली.
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image