पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती...

पनवेल / प्रतिनिधी :- 
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस सक्षमीकरणाचा निर्धार दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. 

यावेळी शेहबाज पटेल यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिका क्षेत्रातील युवकांनी पनवेल राष्ट्रवादी युवक काँग्रेस अधिक मजबूत व सक्षम करण्याचा निर्धार केला.तसेच याप्रसंगी महेबूब भाई यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील युवकांशी संवाद साधला व विविध विषयांवर मार्गदर्शन केले आणि नियुक्ती पत्रं दिली. पनवेल मधील सर्व युवकांच्यावतीने शेहबाज पटेल यांनी युवकांचे प्रश्न सोडवण्याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या माध्यमातून संघटन उभे करणार असल्याचे सांगितले.  
यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस भावना ताई घाणेकर, प्रभारी शहर अध्यक्ष प्रमोद बागल, नवी मुंबई युवक अध्यक्ष अन्नु आंग्रे, अल्पसंख्याक विभाग उपाध्यक्ष फारुक भाई, प्रदेश सरचिटणीस उमेश आग्रवाल, प्रदेश सचिव गुरुज्योत सिंग, भिवंडी कार्याध्यक्ष हरुण खाॅन, प्रदेश सचिव अक्षय डोगंरदिवे आदी उपस्थित होते.  

नव नियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे:  १)शहबाज पटेल जिल्हा अध्‍यक्ष  
२)हर्षद बडे उपाध्यक्ष 
३)हुसेन पटेल उपाध्यक्ष 
४)प्रदीप पाटील उपाध्यक्ष 
५)शमशीर शेख उपाध्यक्ष 
६)सुदर्शन साबळे सरचिटणीस 
७)शादाब बैग सरचिटणीस 
८)साहिल मलंग सचिव  
९)महादेव मोरे सोशल मीडिया 
१०)इम्रान सुभेदार जिल्हा सदस्य  
११)आयान खान जिल्हा सदस्य 
१२)संतोष असबे खारघर अध्‍यक्ष 
१३)फैसल तुपके पनवेल अध्‍यक्ष 
१४)आकीब बक्ष तळोजा अध्‍यक्ष 
१५)आदित्य सुपुकगदे नवीन पनवेल अध्‍यक्ष १६)प्रशांत देशमुखे कळंबोळी अध्‍यक्ष आदींना यावेळी नियुक्ती पत्रे देण्यात आली.
Comments